सावंतवाडीत नवीन मार्केट उभारण्यासाठी १५ कोटी रुपयांची मागणी करणार…

376
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दिपक केसरकर; रवी जाधवांच्या स्टॉलबाबत उद्या बैठक घेवून भूमिका ठरविणार…

सावंतवाडी ता.२५: येथील बाजारपेठेत भाजी मार्केट उभारण्यासाठी प्राप्त झालेला पाच कोटीचा निधी परत गेला आहे.त्यामुळे आता नव्याने पंधरा कोटी रुपये शासनाकडुन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,अशी माहीती आमदार दिपक केसरकर यांनी आज येथे दिली.दरम्यान रवी जाधव यांच्या स्टॉॅलला पालिका प्रशासनाकडुन २४ तासांची मुदत देण्यात आलेली असताना त्यांच्या स्टॉलबाबत उद्या सकाळी दहा वाजता खास बैठक आयोजित करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल,असेही श्री.केसरकर यावेळी म्हणाले.याबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी,तहसीलदार राजाराम म्हात्रे आणि मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या उपस्थितीत येथील तहसिलदार कार्यालयात बैठक झाली.त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सावंतवाडी पालिकेच्या वतीने उभारण्यात येणारे भाजी मार्केट बीओटी तत्त्वावर उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासंदर्भात दीपक केसरकर यांना विचारले असता ते म्हणाले, याठिकाणी बीओटी तत्त्वावर मार्केट उभारणे चुकीचे आहे. शासनाच्या माध्यमातून देण्यात येणारा निधी हा पालिकांच्या उत्थानासाठी असतो. त्या माध्यमातून मिळालेला निधी खर्च करून पालिकेने आपली आर्थिक सुधारण्यासाठी आवश्यक ते प्रयोजन करणे गरजेचे असते. त्यामुळे अशा प्रकारचे नियोजन सावंतवाडी पालिकेने करावे, याबाबत आपण आता भूमिका काही सांगत नाही, असेही केसरकर म्हणाले. पाच कोटी सावंतवाडी भाजी मार्केट साठी मंजूर झाले होते. मात्र कोरोनाच्या काळात ते परत गेले. त्यामुळे आता पुन्हा पंधरा कोटी मिळावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान डिक्री झालेल्या जमिनीत सर्वच गाळे आहेत. त्यामुळे कोणावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेऊ उद्याच्या बैठकीत रवी जाधव यांना निर्णय देण्यासाठी प्रयत्न करू

\