विनाकारण फिरणाऱ्या दोघांवर गुन्हे…

479
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कणकवली-फोंडाघाट येथे कारवाई…

कणकवली, ता.१३ : लॉकडाऊन सुरू असताना देखील विनाकारण फिरणाऱ्यांवर दोघांवर आज पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी भा.द.वि कलम 188 नुसार कणकवली पटवर्धन चौक आणि फोंडाघाट येथे करण्यात आली.
दरम्यान यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार असून, विनाकारण फिरताना आढळल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत अशी माहिती कणकवली पोलिस निरीक्षक अजमुद्दिन मुल्ला यांनी दिली. कणकवली पोलिस आज सकाळपासूनच ॲक्शन मोडमध्ये आले होते. त्यातच पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी जिल्ह्यात स्वतः गस्त घातल्याने येत्या काळात देखील कडक कारवाईचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत.

\