मालवण नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन…

2
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

कल्पिता पिंपळे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा केला निषेध ; कठोर कारवाई करण्याची मागणी…

मालवण, ता. ३१ : ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या कर्तव्य बजावत असताना एका फेरीवाल्याकडून त्यांच्यावर हल्ला झाला. त्यांच्या हाताची बोटे कापली गेली. डोक्यावर गंभीर दुखापत झाली. या घटनेचा राज्यभर निषेध नोंदवला जात आहे. येथील पालिका कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य मुख्य अधिकारी संघटना, मुंबई यांच्या वतीने आज जाहीर निषेध नोंदवत काळ्या फिती लावून कामबंद आंदोलन छेडले.
दरम्यान याबाबत तहसीलदार, पोलीस निरीक्षक व नगराध्यक्ष यांनाही कामबंद निषेध आंदोलनाबाबत निवेदन देण्यात आले.
आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यावर झालेला हा भ्याड हल्ला अत्यंत संतापजनक आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले करतात, तेव्हा अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच नव्हे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते. त्यामुळे अशा प्रकारच्या हल्ल्याचा संघटित निषेध करणे आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे हाच यावरील उपाय आहे. असेही यावेळी कर्मचाऱ्यांनी सांगितले.
मालवण पालिका अधिकारी कर्मचारी या कामबंद आंदोलनात सहभागी झाले. यात सुधाकर पाटकर, रमेश कोकरे, जयसिंग गावित, प्रथमेश कसालकर गीतांजली नाईक, विजय रावले, आनंद म्हापणकर, महेश परब, हेमंत आचरेकर, बस्त्याव फर्नांडिस, सचिन कासले, विश्राम जाधव, राजा केरीपाळे, सुनील चव्हाण, विनायक खरे, वीणा पारधी, लुबना खान, वैभवी तांडेल, रुपेश हडकर आदी सहभागी झाले होते.

\