बांदा बँक ऑफ इंडिया शाखेकडून पाच विद्यार्थिनींना धनादेश वितरित…

3
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा, ता.०७: बँक आॉफ इंडियाच्या ११६ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या उपक्रमांतर्गत बांदा शाखेच्या वतीने जिल्हा परिषद बांदा केंद्रशाळेतील पाच विद्यार्थीनींना धनादेशाचे वितरण करण्यात आले.
१ ते ७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत बँक ऑफ इंडियाच्या वतीने वर्धापन सप्ताह साजरा केला जात असून बांदा शाखेच्या वतीने जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं .१ येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच अक्रम खान, जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, पंचायत समिती उपसभापती शितल राऊळ, बँकेचे बांदा शाखेचे वरिष्ठ शाखा प्रबंधक अंकित धवन, प्रबंधक बाबजी बिचाला, कॅशियर बाळकृष्ण नाहावी, मुख्याध्यापक सरोज नाईक ,शाळा व्यवस्थापन सदस्य संतोष बांदेकर आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रशाळेतील विद्यार्थीनी आदिती सावंत, ईशा गवळी, युगा सावंत, पूर्वी मांजरेकर, युतिका बांदेकर या विद्यार्थींनीना मान्यवरांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.
यावेळी वरिष्ठ शाखा प्रबंधक अंकित धवन यांनी बँकेच्या विविध योजनांची माहिती समजावून सांगितली. सभासदांनी विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद श्वेता कोरगावकर यांनी बँकेच्या उपक्रमाचे कौतुक केले. शितल राऊळ यांनी बांदा शाळेसाठी विविध योजनाचा लाभ मिळवून देणार असल्याचे सांगितले. सरपंच अक्रम खान यांनी बांदा शाळेसाठी मिळत असलेल्या योगदानाबद्दल सर्व दात्यांचे आभार मानले . यावेळी मुख्य शाखा प्रबंधक अंकित धवन यांनी शाळेसाठी शोभिवंत फुलझाडे व कुंडया भेट दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सरोज नाईक यांनी केले. सूत्रसंचालन जे. डी. पाटील यांनी केले तर आभार शुभेच्छा सावंत यांनी मानले.

\