विजेच्या धक्क्याने बेशुद्ध पडलेल्या माकडाला सावंतवाडीत जीवदान…

3
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१८: विद्युतभारीत तारेचा शॉक लागून बेशुद्ध पडलेल्या माकडाला सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी जीवदान दिले. ही घटना आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास भटवाडी परिसरात घडली. संबंधित माकड शॉक लागून उंचावरून खाली पडल्यामुळे जखमी झाले होते. दरम्यान याबाबतची माहिती वि.स.खांडेकर महाविद्यालयचे मुख्याध्यापक राजाराम पवार यांनी सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव यांना दिली. त्यानुसार श्री.जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत “त्या” माकडाला उपचारासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे स्वाधीन केले. दरम्यान उपचारानंतर संबंधित माकड शुद्धीवर आल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

यावेळी वनविभागाचे अधिकारी प्रमोद सावंत, दीपक भराडी, आदींनी माकडाचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न केले.

\