वेंगुर्लेतील “वयपरत्वे घ्यावयाची गुडघ्यांची काळजी” व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

0
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले,ता.१८: फास्ट चालल्यावर गुडघे दुखतात, मी चालणे थांबवावे का? मला पायऱ्या चढताना त्रास होतो. काय करु? मला गुडघेदुखीमुळे योगासने करता येत नाहीत. यावर उपाय काय? वयपरत्वे गुडघेदुखी वाढु नये म्हणुन मी कोणती काळजी घ्यावी? कोणता व्यायाम गुडघ्यांसाठी चांगला? या व यासारख्या असंख्य शंकांचे शास्त्रीयदृष्ट्या निरसन आणि मार्गदर्शन मॅंगलोर येथील अस्थिरोगतज्ञ व गुडघारोपण शस्त्रक्रिया तज्ञ डाॅ. योगीश कामत यांनी व्याख्यान द्वारे वेंगुर्ले येथे केले.

वेंगुर्ला नगरपरिषद च्या स्वामी विवेकानंद हाॅल मध्ये आज रविवार दि १७ एप्रिल रोजी डाॅ. योगीश कामत यांचे “वयपरत्वे घ्यावयाची गुडघ्यांची काळजी”

या विषयावरील व्याख्यान वेंगुर्ला मेडिकल असोशिएशन, वेंगर्ला नगरपरिषद, लिनेस क्लब आॅफ वेंगुर्ला, ह्युमन राईट्स असोशिएशन, ज्येष्ठ नागरिक संघटना, सेवानिवृत प्राथमिक शिक्षक संघ यांच्याकडून आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

वेंगुर्ले येथे व्याख्यान देताना अस्थिरोग तज्ञ डॉ. योगेश कामत यांच्या सोबत वेंगुर्ला मेडिकल असोशिएशन अध्यक्ष डॉ.राजेश्वर उबाळे, सचिव डॉ.संजीव लिंगवत, डॉ.प्रल्हाद मणचेकर, डॉ. नामदेव मोरे, लिनेस क्लब आॅफ वेंगुर्लाच्या अँड.सुषमा खानोलकर, ह्युमन राईट्स असोशिएशनचे वेंगुर्ले अध्यक्ष डॉ.आर् एम्.परब,

ज्येष्ठ नागरिक संघटनेचे रा.पा.जोशी, सेवानिवृत प्राथमिक शिक्षक संघ पदाधिकारी शहरातील तमाम नागरिक उपस्थित होते.

\