बांद्यात दारूसह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त : बांदा पोलीसांची कारवाई

158
2

बांदा, ता. १९ : इन्सुली उत्पादन शुल्क, उत्पादन शुल्कचे भरारी पथकां पाठोपाठ बांदा पोलीसांनीही गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर कारवाई केली. बेकायदा दारू वाहतुकी विरोधात कारवाई करण्यासाठी तीनही विभागात स्पर्धा पहायला मिळाली. यावरून गोव्यातून महाराष्ट्रात किती मोठ्या प्रमाणात दारू वाहतुक होत असते याचा अंदाज येतो. उत्पादन शुल्क विभाग किंवा पोलीस कोणत्याही दिवशी बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई करू शकतात हे स्पष्ट होते. मात्र त्यांची मानसिकता महत्वाची आहे.
बांदा शहरात कट्टा कॉर्नर येथे अल्टो कारवर बांदा पोलिसांनी कारवाई करत ५१ हजार रुपये किमतीच्या दारुसह एकूण १ लाख ५१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अजित बाळकृष्ण मठकर (३३, रा. सावंतवाडी) याला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई गुरूवारी सायंकाळी उशिरा करण्यात आली.

4