मासेमारी बंदी कालावधीनंतर रापण महोत्सव घेणार… मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांची ग्वाही ; बाबा मोंडकर यांची माहिती…

172
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मालवण, ता. १९ : मासेमारी बंदी कालावधीनंतर येथे भाजपच्यावतीने रापण महोत्सव
घेतला जाईल असे आश्वासन राज्याचे मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी हडी येथे दिले. मच्छीमार व्यवसाय माहिती केंद्र व संग्रहालयासाठी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या लवकर प्रस्ताव सादर करावेत अशा सूचना मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिल्या आहेत अशी माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली.
मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी दौऱ्या दरम्यान हडी ग्रामपंचायतीस भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीच्यावतीने सुरू असलेल्या पर्यावरण संवर्धन, खेकडा पालन, मत्स्यशेती प्रकल्पाची माहिती घेतली. शासनाच्यावतीने अशा प्रकारच्या प्रकल्पासाठी भरीव मदत केली जाईल असे आश्‍वासन श्री. जानकर यांनी यावेळी दिले. मत्स्यबंदी कालावधी नंतर येथे रापण महोत्सव घेण्यात येणार असून या महोत्सव आपण उपस्थित राहू असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मच्छीमार कोळीवाडा सर्वेक्षण तसेच मच्छीमारांचे घर व त्याखालील जमीन नावावर होणे याबाबत मुंबई येथील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. असे सर्वेक्षण सिंधुदुर्गात करण्यासाठी आदेश देण्यास त्यांनी अनुकूलता दर्शविली. मच्छीमार संस्थाना डिझेल विक्री सोबत पेट्रोल विक्रीसाठी प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. डिझेल इंधन अनुदान धर्तीवर पेट्रोल इंधनावर अनुदान, राष्ट्रीय सहकार विकास निगम योजनेचे कर्ज व व्याजमाफी, मत्स्य साहित्य (होडी, जाळी, इंजिन) वर वस्तू व सेवा करापासून सूट यासाठी शासनाच्यावतीने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाईल असे स्पष्ट केले. बांधकाम कल्याणकारी मंडळ धर्तीवर मच्छीमार असंघटित कामगारांसाठी योजना राबविण्यात येतील. महिला बालकल्याण व मत्स्य खात्यामाफत मासळी विक्री महिलांसाठी मच्छीबंदी कालावधीसाठी अनुदान योजना राबविली जाईल. बेघर मच्छीमार कुटुंबासाठी स्मार्ट व्हिलेज संकल्पना व मच्छीमार निवास न्याहारीसाठी प्रस्ताव सादर करावेत अशा सूचना त्यांनी केल्या.
मच्छीमारांच्या जिल्हास्तरीय समितीच्या सूचनेवरून कायदा बनविणे, नुकसान भरपाई ठरविण्याविषयी त्यांनी अनुकूलता दर्शविली. मत्स्यहेचरीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अनधिकृत मासेमारीविरोधात शासन कठोर पावले उचलत आहेत. प्रलंबित मुद्यांवर लवकरच मंत्रालयस्तरावर बैठक घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाबा मोंडकर, सरपंच महेश मांजरेकर, अवी सामंत, बबलू राऊत, अभी गावडे, सौ. रश्मी लुडबे, सौ. समीक्षा खोबरेकर, किशोर नरे तसेच हडी ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते.

\