शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस सावंतवाडीत साजरा

234
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२७ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आज पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात शहर शाखेच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे व माजी शहराध्यक्ष शब्बीर मणियार यांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच आगामी काळात होणाऱ्या निवडणुका शिवसेनेला यश मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी राजन पोकळे, अशोक दळवी, शब्बीर मणियार , रश्मी माळवदे, नीता सावंत,श्रुतिका दळवी, भारती मोरे, शैलजा पारकर, कमल मडगावकर, जयश्री ठाकूर, शितल नाईक, शुभांगी सुकी,गजानन नाटेकर, बाबू कुडतरकर, विश्वास घाग, जया राणे, तसेच मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

\