वाचक स्पर्धेतून भविष्यात चांगले लेखक निर्माण होतील

2

महेंद्र देसाई; कळणे नूतन विद्यालयात वाचक स्पर्धे दरम्यान प्रतिपादन

दोडामार्ग ता.०३: वाचक स्पर्धेच्या या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होते व भविष्यात अशा स्पर्धांच्या माध्यमातून चांगले लेखक तयार होतील असा आशावाद धरणे प्रतिष्ठान साटेली आयोजित वाचक स्पर्धेवेळी मुख्याध्यापक महेंद्र देसाई यांनी नूतन विद्यालय कळणे या प्रशालेत व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर श्रेष्ठ शिक्षक प्रशांत राऊळ सांस्कृतिक विभाग प्रमुख उमेश देसाई आदी उपस्थित होते यावेळी प्रशालेतील दहा विद्यार्थ्यांनी विविध लेखकांच्या प्रतिशत पुस्तकावर परखड विचार केले मधु मंगेश कर्णिक यांच्या “वेचक” नरेंद्र जाधव यांच्या “आमचा बाप आणि आम्ही” परमेश डेगवाल यांच्या “आय डेअर किरण बेदी”अशा विविध पुस्तकावर आपले विचार मांडले यावेळी राऊळ यांनी वाचक स्पर्धा हा खरंतर कॉलेज पातळीवरचे विषय आहे पण तुम्ही विद्यार्थ्यांनी तो सक्षम पणे पेलून इतरांना आदर्श निर्माण केला आहे असे विचार मांडले.
या स्पर्धेत “या जगात देव आहे का” या पुस्तकावर विचार व्यक्त करून अश्विनी मेस्त्री हिने तृतीय,सद्गुरु वामनराव पै यांच्या “परमेश्वर आहे का”या पुस्तकावर विचार व्यक्त करून नम्रता सावंत यांनी द्वितीय तर शांताबाई दळवी यांच्या “दलित स्त्रियांची आत्मकथा” या पुस्तकावर विचार मांडून वैष्णवी संतोष परब हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला स्पर्धेचे निरीक्षण प्रशांत राऊळ व संजय तायवाडे यांनी केले या स्पर्धेत सानिका सावंत पवन गावकर कृष्णा सुतार मानसी कळणेकर ओमकार गावकर या विद्यार्थ्यांनी भाग घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी नुपुर भुजबळ हिने तर आभार सीमंतिनी वालावलकर हिने मानले.

4