खांबाळे येथे रस्त्यावर झाड कोसळून वाहतूक ठप्प

153
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सुदैवाने जिवीतहानी टळली; उशिरा वाहतूक पूर्ववत

वैभववाडी/प्रतिनिधी : शनिवारी पहाटे झालेल्या जोरदार वादळी पावसाने खांबाळे केंद्र शाळेच्या आवारातील आंबा कलमाचे मोठे झाड उन्मळून कोसळले. यामुळे फोंडा-वैभववाडी मार्गावरील वाहतूक सकाळी सुमारे दोन तास ठप्प होती. सुदैवाने जिवीतहानी ठळली. दरम्यान ग्रामस्थांनी कटर मशिनच्या साहाय्याने झाड कापून बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
शनिवारी पहाटे झालेल्या जोरदार वादळी पावसाने खांबाळे केंद्र शाळेच्या आवारातील शाळेचे आंबा कलमाचे मोठे झाड रस्त्यावर मोडून पडले. आंब्याचे झाड विदयुत वाहीण्यांवर पडल्यामुळे विदयुत वाहीण्या व एक पोल मोडून पडला आहे.
खांबाळे केंद्र शाळेजवळच खांबाळे एस,टी.बस थांबा आहे. याठिकाणी नेहमी वाहनांची वर्दळ असते. शनिवारी सकाळची शाळा असल्यामुळे ७ नंतर विदयार्थी शाळेत येतात. सुदैवाने त्याअगोदरच ६ वा.सुमारास झाड मोडून पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
ग्रामस्थांनी कट्टर मशिनच्या साहाय्याने झाड कापून बाजूला करुन मार्ग मोकळा केला.यामध्ये छोटू गुरव, प्रमोद लोके, संजय लोके, अरुण पवार, जयवंत मोहीते, वायरमन चट्टे यांनी मेहनत घेतली.

\