माझ्या मनातील उमेदवार सावंतवाडीला देणार : निलेश राणे | संजू परब यांना भेटीत दिला शब्द

2

सावंतवाडी,ता.३ : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी बाबत विचार करू असे आमदार नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी आज महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांची भेट घेतली. यावेळी तब्बल अर्धा तास गुप्त चर्चा झाली. श्री राणे यांनी विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला.याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही परंतु संजू तू काम करतोयस ना ? असा प्रश्न श्री राणे यांनी संजू परब यांना विचारला तसेच माझ्या मनातला उमेदवार सावंतवाडीला मिळेल असा शब्द श्री परब यांना दिला असे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. तसेच काही झालं तरी परब यांच्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल अशी सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. यावेळी शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर, पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर, मंदार नार्वेकर, मनोज नाटेकर, दिलीप भालेकर, केतन आजगावकर,उदय नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

24

4