Saturday, December 14, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यावादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा दोन कोटीच्या घरात

वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा दोन कोटीच्या घरात

 

पाच व्यक्तींचा मृत्यू:प्रशासनाकडून 486 नुकसानग्रस घरांना सहा लाखाची भरपाई

सिंधुदुर्गनगरी ता.१६:

वाऱ्यासह मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.आतापर्यंत सार्वजनिक आणि खाजगी अशा १५९ मालमत्तेचे १ कोटी ९१ लाख ६९ हजार ६४७ रुपयांचे नुकसान झाले आहे.तर ५ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.तर यात अंशतः पडझड झालेल्या ८३० घरांपैकी ४८६ घरांना प्रशासनाकडून ६ लाख १५ हजार रूपये एवढी नुकसान भरपाई दिली आहे.मात्र पूर्णतःपडझड झालेल्या ४ घरांना प्रशासनाने कोणतीही नुकसान भरपाई दिलेली नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी मुसळधार पाऊस पडतो. यावर्षीही पडला आहे. मुसळधार पावसाबरोबरच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रस्त्यांवर, घरांवर, गोठ्यांवर अन्य इमारतिंवर झाडे पडून नुकसान होत आहे. मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाने जिल्ह्यात कहर केला होता. अनेक ठिकाणी पुरस्थिति निर्माण झाली होती. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. या सर्व प्रकारात घरांची आणि गोठ्यांची पडझड मोठ्या प्रमाणात होत आहे. सार्वजनिक इमारतीसह खाजगी इमारतीचेही नुकसान झाले आहे. १ जून ते आतापर्यंत झालेल्या पावसामुळे ६ सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख २६ हजार ४०० रुपयांचे तर १५३ खाजगी मालमत्तेचे १ कोटी ९० लाख ३३ हजार २४७ रुपयांचे नुकसान झाले आहे. एकंदरित पावसामुळे १५९ सार्वजनिक आणि खाजगी मालमत्ता बाधीत झाल्या असून १ कोटी ९१ लाख ५९ हजार ६४७ रुपयांचे नुकसान झाले आहे.
तसेच पावसामुळे २३० पक्क्या घरांची अंशतः पडझड झाली असून त्यापैकी ११५ घरांना ५५ हजार १५० रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे. ६०० कच्च्या घरांची अंशतः पडझड झाली असून ३७१ घरांना ६ लाख १५ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. ११० गोठे बाधीत झाले असून त्यापैकी ६८ गोठ्यांना २१ हजार १०० रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तसेच पूर्णतः पडझड झालेल्या ४ घरांना प्रशासनाने कोणतीही नुकसान भरपाई दिलेली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments