उभादांडा ग्रामपंचायत तर्फे गावातील १७ आपत्तीग्रस्तांना आर्थीत मदत

206
2
Google search engine
Google search engine

 

वेंगुर्ले ता.१६:

उभादांडा ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रथम एक ते तीन क्रमांक प्राप्त झालेल्या शालेय विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण तसेच गावातील नैसर्गीक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आपत्तीग्रस्थांना, पूरग्रस्त एकूण १७ लाभार्थ्यांना ग्रामपंचायत उभादांडाच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली.तसेच अंगणवाडीतील मुलांना गणवेश,आहार व अंगणवाडीना फिल्टरचे वितरण सरपंच देवेंद्र डिचोलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
उभादांडा ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ग्रा.प. सदस्य संभाजी भूते, मनस्वी सावंत, कालेस्तीना आल्मेडा, श्रद्धा कुडाळकर, गणेश चेंदवणकर, स्मिता केरकर, अपेक्षा बागायतकर, शिवाजी पडवळ, दयानंद खर्डे तसेच माजी सभापती जयप्रकाश चमणकर, ग्रामविकास अधिकारी अरुण जाधव, तलाठी निलीमा सावंत,पोलीस पाटील विजय नार्वेकर, कृषी सहाय्यक सहदेव राऊळ, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका तसेच विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.