गळफास लावून वाफोली येथे फरशी कामगाराची आत्महत्या…

435
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा,ता.०८: वाफोली-कुडेरानवाडी येथील फरशी कामगाराने भाड्याने राहत असलेल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मोहम्मद इकबाल मदार शेख (वय ४६) असे त्याचे नाव आहे. ही घटना आज सकाळी ६ वाजता उघडकीस आली. त्यांच्या मागे पत्नी आहे. ते मूळचे पुणे येथील असून कर्ज असल्यामुळे त्याने हा प्रकार केला असावा असा प्राथमिक संशय आहे. पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी जात पंचनामा केला. मयत शेख हे बांदा परिसरात फरशी बसविण्याचे काम करत होते.

\