मशवी गावव्हाळ येथे रिक्षा- खासगी आराम बसमध्ये अपघात…

1395
2
Google search engine
Google search engine
Google search engine

रिक्षेतील मुलगा गंभीर जखमी ; अपघातानंतर बसचालक पसार…

आचरा, ता. ८ : आचरा देवगड रस्त्यावर मशवी गावाव्हाळ येथील अवघड वळणावर खासगी बसने दहिबावच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षेला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. ही धडक एवढी जोरात होती की रिक्षेमध्ये उजव्या बाजूस बसलेल्या नऊ वर्षाच्या मुलाचा उजवा पायांचे दोन तुकडे झाले. रिक्षातील मुलाचे आई वडीलही जखमी झाले. अपघात झाल्यावर जखमींना आचरा रुग्णालयात हलविण्यात आले तेथून अधिक उपचारासाठी ओरोस येथे हलविण्यात आले. या अपघात झाल्याचे समजल्यानंतर देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस विजय बिर्जे, सागर चौगले घटनास्थळी दाखल झाले होते.
या अपघातात रिक्षामधील रुद्र लवू घाडी (वय-९), लवू धोंडू घाडी (वय-४५), रुचिता लवू घाडी (वय-४०) सर्व रा. दहिबाव हे गंभीर जखमी झाले. रिक्षा चालक वसंत गोविंद परब रा. पोईप यांना किरकोळ दुखापत झाली.
दहिबाव येथील लवू घाडी हे आपल्या कुटूंबासमवेत पत्नीच्या माहेरी मालडी येथे काही दिवसापूर्वी गेले होते. ते मालडी येथून आज सकाळी आचरा मार्गे देवगड- दहीबांव येथे पोईप येथील रिक्षाने मालडी येथून पत्नी रुचिता व मुलगा रुद्र यांच्या समवेत जात होते. सकाळी साडे नऊच्या सुमारास आचरा देवगड रस्त्यावर माशवी गावव्हाळ येथील अवघड वळणावर आले असता समोरून आचऱ्याच्या दिशेने येणाऱ्या आराम बसने (क्रमांक एम. एच ०४- जीपी- १८७५) रिक्षेच्या (क्रमांक एम. एच. ०७- एफ- २११५) उजव्या बाजूला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की काही अंतर रिक्षा फरफटत जाऊन कलंडली. धडकेत उजव्या बाजूला बसलेला रुद्र घाडी याचा उजवा पाय रिक्षा आणि आरामबसच्या भागात सापडल्याने पायाचे दोन तुकडे झाले. तर रिक्षातील लवू घाडी व रुचिता यांनाही डोक्याला व कानाच्या मागे गंभीर दुखापती झाल्या. अपघातानंतर आरामबस चालकाने तेथून पलायन केले. रस्त्याने येणाऱ्या प्रवाशी व स्थानिकांनी जखमींना उपचारासाठी आचरा आरोग्य केंद्रात हलवले होते. अपघात झाल्याचे समजल्यानंतर स्थानिक व दहिबाव येथील ग्रामस्थ जमा झाले होते. पसार झालेल्या चालकाला पकडून आणण्याची मागणी ग्रामस्थांनी देवगड पोलिसांकडे लावून धरली होती.

\