मळगाव सरपंच गणेश प्रसाद पेडणेकरांच्‍या अविश्‍वास ठरावाला मंजुरी :जिल्हाधिकाऱ्यांनी अपील फेटाळले…

2

सावंतवाडी.ता,१२:  मळगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर यांच्या विरोधात घेण्यात आलेल्या अविश्‍वास ठरावाचे अपील जिल्हाधिकाऱ्याने फेटाळले आहे.

श्री पेडणेकर यांच्याविरोधात ग्रामपंचायतीच्या १३ पैकी ९ सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता ९ विरुद्ध तीन एवढ्या संख्येने हा ठराव मंजूर करण्यात आला होता.याबाबत सावंतवाडी तहसीलदार यांच्याकडे सुनावणी झाली होती.या विरोधात श्री पेडणेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले होते. या अपिलावर आज सुनावणी झाली यात त्यांचे अपील फेटाळण्यात आले आहे. याकामी विरोधकांच्या वतीने अॅड.परीमल नाईक, गणेश वारंग,सुशील राजगे,प्रिया गावकर यांनी काम पाहिले.

11

4