वैभववाडी/पंकज मोरे .ता,१२: तालुक्यात गेल्या पंधरा दिवसापासून बी.एस.एन.एल. सेवेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे इंटरनेट सुविधेचा लपंडाव सुरू झाल्यामुळे बँकांचे व्यवहार अधूनमधून ठप्प होत आहेत. बँकासह सरकारी कार्यालयातील कामकाजावरही त्याचा परिणाम होत असल्याने नागरीकांची खूपच गैरसोय होत आहे.
तालुक्यात गेल्या पंधरा दिवसापासून इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. इंटरनेट सेवेचा लपंडाव सुरू झाल्याने बँकिंग क्षेत्रासह सरकारी कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. नेट सेवा विस्कळीत होत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत नागरीकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.