सावंतवाडी आगाराच्या जखमी कर्मचाऱ्याचे पुण्यात निधन…

1215
2
Google search engine
Google search engine
Google search engine

एसटीचा जॅक सटकून घडला होता अपघात;पाठीला होती गंभीर दुखापत…

सावंतवाडी ता .२४: येथील एसटी आगारात काम करत असताना जॅक सरकल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कर्मचा-याचे उपचारा दरम्यान निधन झाले.ही घटना काल रात्री पुणे येथे घडली.देवेद्र प्रकाश नाईक वय.३२ ,असे त्याचे नाव आहे.याबाबत एसटीचे अधिकारी शकील सय्यद यांनी दुजोरा दिला आहे.
हा अपघात २५ ऑक्टोबरला सावंतवाडी आगारात घडला होता.सहाय्यक कारागिर देवेंद्र नेहमीप्रमाणे आपले काम करत असताना अचानक गाडीला लावलेला जॅक सुटला व त्याच्या कमरेखालच्या अंगावर कोसळला यात तो गंभीर जखमी झाला होता.त्याच्यावर गोवा बांबुळी येथे उपचार सुरु होते.मात्र त्याठिकाणी त्याच्यावर योग्य ते उपचार न झाल्यामुळे त्याला पुणे येथील युनिव्हर्सल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
याबाबतची माहिती श्री.सय्यद यांनी दिली.तो एसटी खात्यात परमनंट होता.दरम्यान याबाबत सावंतवाडीचे माजी नगरसेवक उमाकांत वारंग त्यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले सायंकाळपर्यंत त्याचा मृतदेह सावंतवाडीत आणण्यात येणार आहे देवेंद्र मनमिळावू होता.

\