मनसेची मागणी;तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना दिले निवेदन…
सावंतवाडी ता.१०: आरोंदा गावासाठी कायमस्वरूपी तलाठी देण्यात यावा,अशी मागणी आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी येथील तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे केली.दरम्यान याबाबत योग्य ती कार्यवाही न केल्यास आंदोलन छेडावे लागेल,असा इशारा यावेळी त्यांनी दिला.याबाबत आरोंदा ग्रामस्थांनी आज श्री.म्हात्रे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
आरोंदा तलाठी सजा खाली तीन महसूल गावे आहेत.तीन हजाराच्या वर लोकसंख्या आहे.मात्र गावात कायमस्वरूपी तलाठी नसल्यामुळे शेतकऱ्यांना व शाळकरी विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.ग्रामस्तरावरील अनेक विकास कामे रखडली आहेत.अनेकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.त्यामुळे तात्काळ याबाबत योग्य ती भूमिका घेऊन तलाठी कायमस्वरूपी देण्यात यावा,अशी मागणी करण्यात आली.
यावेळी मनसेचे विभाग प्रमुख नरेश देऊलकर, महेश बांदिवडेकर, शहराध्यक्ष आशिष सुभेदार ,संतोष भैरवकर, विनय सोनी, ललिता नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.