वेंगुर्ला.ता.२३: कोरोना विषाणू विरोधातील राज्यशासनाच्या लढ्याला हातभार म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी वेंगुर्ला उपनगराध्यक्षा अस्मिता अजित राऊळ यांनी आपले एक वर्षाचे मानधन मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्याकडे सुपूर्द केले.
वेंगुर्ला नगरपरिषदेच्यावतीने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपपयोजना करण्यात येत आहे. तसेच शहरात गर्दी होऊ नये यासाठी योग्य नियोजनही करण्यात आहे आले. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत उपनगराध्यक्षा राऊळ यांनी आपले १ वर्षाचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले आहे.