बांदा- पत्रादेवी सीमेवर येणाऱ्या गाड्यांची गोव्याकडून कसून चौकशी…

339
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी; दोन किलोमीटरवर लांबच लांब रांगा…

बांदा.ता,२३: 
महाराष्ट्र-गोवा सीमेवर बांदा -पत्रादेवी चेकपोस्टवर गोव्यात अत्यावश्यक मालाचा पुरवठा करणाऱ्या वाहनांची गोवा शासनाने कसून तपासणी सुरु केली आहे. अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍या वाहनांच्या कागदपत्रांसह चालक व क्लीनरची आरोग्यविषयक तपासणी केल्यानंतरच गोव्यात प्रवेश दिला जात आहे. एका वाहनासाठी सुमारे अर्धा तास लागत असल्याने बॉर्डरवर वाहनांच्या सुमारे दोन किमी. पर्यंत रांगा लागल्या आहेत. तपासणीसाठी गोवा सरकारकडून केवळ एकच काऊंटर देण्यात आला आहे. त्यामुळे मासे, दूध, अंडी यासह नाशवंत वस्तुंची वाहतुक करणार्‍या वाहनधारकांची धाकधुक वाढली आहे. तपासणीसाठी साधारणपणे पाच-सहा तासांचा कालावधी गेल्यास नाशवंत वस्तुंच्या नुकसानीस जबाबदार कोण ? असा सवाल वाहनधारकांनी उपस्थित केला. मात्र, गोवा पोलीसांनी सरकारकडून मिळालेल्या निर्देशानुसार तपासणी होत असल्याचे स्पष्ट केले. गोवा हे देशातील पहिले कोरोनामुक्त राज्य झाले असून भविष्याचा विचार करुन सरकारने गोव्यात येणार्‍यांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतल्याचे गोवा पोलीस अधिकारी नरेश मानगादकर यांनी सांगितले.

 

\