तयार आंंबे अचानक गळू लागल्याने बागायतदार चिंतेत….

316
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्लेतील परिस्थिती; वातावरणातील बदलामुळे परिणाम झाल्याचे जाणकारांचे म्हणणे…


वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे वेगुर्ले तालुक्यात तयार झालेले आंबे अचानक झाडावरुन गळत असल्यामुळे बागायतदार चिंतेचे सापडले आहेत.तर एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमिवर असलेल्या लॉकडाऊनमुळे बाजारपेठ मिळणे मुश्कील असताना,अशा प्रकारे हाताताेंंडाकडे आलेला घास जात असल्यामुळे आता बागायदारांना नव्या संकटाला तोंड ध्यावे लागत आहे.दरम्यान सद्यस्थितीत शासनसुद्धा कोरोना सारख्या महाभयंकर संकटात असताना,मदतीची याचना कोणाकडे करायची,असा प्रश्न आता बागायतदारांना भेडसावू लागला आहे.
दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी आंब्याचे उत्पन्न कमी होते.त्यामुळे शेतकऱ्यांना असलेल्या उत्पादनाला चांगला बाजारभाव मिळण्याची अपेक्षा होती.मात्र अचानक आलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे या आंब्याला चांगली बाजारपेठच उपलब्ध होऊ शकली नाही.त्यामुळे मिळेल त्या बाजार भावाने आंबा विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.यातच दोन दिवसापूर्वी अचानक उष्णता वाढल्यामुळे आंब्याचे पीक मोठ्या प्रमाणात गळू लागले आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी आंब्याच्या झाडाखाली गळून पडलेल्या आंब्यांचा सडा पाहायला मिळत आहे.तर खाली पडलेल्या आंब्याचा काहीच उपयोग नसल्याचे आंबा बागायतदार हवालदिल बनले आहेत.त्यामुळे बागेसाठी लाखो रुपये मोजून आणि हजारोंच्या औषधांची फवारणी करून हातातोंडाशी आलेली फळे गळून पडल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान या शेतकऱ्यांना सहन करावे लागणार आहे.याच चिंतेत असलेल्या शेतकरी कोरोना महामारीच्या काळात आता मदतीची अपेक्षा कोणाकडे करणार,असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

\