इतिहासातील पहीलीच घटना; अनेक भक्तगणांनी घेतले युटयूबवर दर्शन…
वेंगुर्ले,ता.२८: आरवली येथील नवसाला पावणारा देव म्हणून प्रसिध्द असलेल्या श्री देव वेतोबाचा वाढदिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला.विशेष म्हणजे लॉकडाउनचे आदेश असल्यामुळे दरवर्षी प्रमाणे या धार्मीक कार्यक्रमाला गर्दी नव्हती, तर इतिहासात पहील्यांदा श्रीचे दर्शन “ऑनलाईन” घेण्याची संधी हजारो भक्तगणांना मिळाली.
लॉकडाउनच्या पार्श्वभूमिवर आज होणारा कार्यक्रम लाईव्ह दाखविण्याचा निर्णय देवस्थान समितीच्यावतीने घेण्यात आला होता. तसेच या कार्यक्रमाला दरवर्षी प्रमाणे गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार भक्तगणांनी याला उत्फुर्त प्रतिसाद दिला. याबाबत देवस्थानचे अध्यक्ष जयवंत राय यांनी भक्तगणांचे आभार मानले.