सावंतवाडी शहरात पाच दुकानांवर पोलिसांकडून कारवाई,गुन्हा दाखल…

2

कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन; किराणा,बेकरी,हार्डवेअर व भाजी विक्री दुकानांचा समावेश…

सावंतवाडी ता.२९: शहरात कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करत दुकाने सुरू ठेवल्याप्रकरणी आज पाच दुकानावर पोलिसांनी कारवाई केली.यात किराणा,बेकरी व हार्डवेअर दुकान प्रत्येकी एक ,तर दोन भाजी विक्रेत्या दुकानांचा समावेश आहे.दरम्यान संबंधितावर सावंतवाडी पोलिस ठाण्यात कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश जाधव,पोलीस सतीश कविटकर,धनंजय नाईक,महेश जाधव यांच्या पथकाने केली.

10

4