सिंधुदुर्गसाठी मिळालेल्या नव्या ९ रुग्णवाहिकांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण…

33
2
Google search engine
Google search engine
Google search engine

शिवसेनेच्या आमदार-खासदारांचा पाठपुरावा; राज्य शासनाकडून ६, तर खनिकर्म विभागाकडून ३ रुग्णवाहिका…

सिंधुदुर्गनगरी ता.२९: जिल्ह्यासाठी राज्यशासनाच्या माध्यमातून ६ नवीन रुग्णवाहिका आणि खनिकर्म विभागाच्या माध्यमातून ३ नवीन रुग्णवाहिका,असे एकूण ९ रुग्णवाहिका उपलब्ध केल्या आहेत.यासाठी पालकमंत्री उदय सामंत,खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक,दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.दरम्यान आज ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयात या रुग्णवाहिकांचे श्री.सामंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर रुग्णांची ने-आण करण्यासाठी अँब्युलन्सची कमतरता भासता नये यासाठी पालकमंत्री ना. उदय सामंत, खा. विनायक राउत, आ. वैभव नाईक, आ.दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे प्रयत्न सुरु आहेत. याआधीही राज्यशासनाकडे पाठपुरावा करून जिल्ह्यासाठी रुग्णवाहिका उपल्बध करण्यात आल्या आहेत. कोरोनाची दुसरी लाट आली असून तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज आणखी ९ नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या असून आज याचे लोकार्पण करण्यात आले. यामुळे रुग्णांना याचा लाभ होणार आहे.
यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. महेश खलिपे, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.श्रीपाद पाटील, शिवसेना नेते संदेश पारकर, नितीन वाळके, संजय भोगटे, सुभाष मयेकर आदी उपस्थित होते.

\