सिंधुदुर्गातील कोरोनाग्रस्तांची संख्या पंधरा दिवसात कमी करण्याचे उद्दिष्ट…

2

पालकमंत्र्यांचा विश्वास ; जिल्ह्यात नव्याने पन्नास ठिकाणी उभारणार कोविड सेंटर…

ओरोस,ता.२९: कोरोनाला रोखण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात २० बेडचे कोविड सेंटर,तसेच ५ हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात २० बेडचे कोविड सेंटर अशी जिल्ह्यात ५० ठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. अशी माहीती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. दरम्यान आपला जिल्हा सध्या रेड झोनमध्ये असला तरी पुढील पंधरा दिवसात जिल्ह्यातील नवीन रुग्णांची संख्या कमी होईल.त्या दृष्टीने आम्ही नियोजन केले असून उपाययोजना आखल्या आहेत. जिल्ह्यासाठी दोन फिजिशियन नियुक्त करण्यात आले असून ते आठ दिवसांत हजर होतील. आपण १० रुग्नवाहिका देण्याचे मान्य केले होते. प्रत्येक्षात २१ रुग्ण वाहिका दिल्या आहेत. पालकमंत्री सामंत शनिवारी एक दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कोरोना आढावा, खरीप हंगाम बैठक व तौक्ते नुकसानी वाटप याबाबत प्रशासना सोबत बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलिपे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
सारस्वत बँकचे अध्यक्ष गौतम ठाकुर यानी आपल्या सीएसआर मधून ५० ऑक्सीजन देण्याचे मान्य केले आहे. जिल्ह्यातील ऑक्सीजन रिफिलिंग प्लांटचे काम पूर्णत्वाकडे गेले असून पुढील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. ज्या १२४ गावांत कोरोनाचा शिरकाव झालेला नाही त्या गावांत जावून लसिकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात १४८ ऑक्सीजन बेड वाढविण्यात येणार आहे.

0

4