निगुडे-तेलीवाडी तूर्तास कंटेनमेंट झोन मध्ये नाही…

2

सरपंचाकडून स्पष्टीकरण; युवाशक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट…

बांदा,ता.०५:
निगुडे-तेलीवाडी मध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण भेटल्यामुळे भविष्यात जर या वाडीमध्ये रुग्णाचे प्रमाण कमी न झाल्यास ही वाडी पूर्ण पणे कंटेंन्मेंट झोन करण्यात येईल असे वक्तव्य निगुडे गावचे सरपंच समीर गावडे यांनी केल्याने तेलीवाडी ग्रामस्थांनी सरपंचाना याबाबत जाब विचारला.
तेलीवाडी येथील बहुउद्देशीय सभागृहात ग्रामस्थांनी याबाबत सरपंच गावडे यांच्याशी चर्चा केली. यावेळी संपूर्ण निगुडे गावात केवळ ७ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत आणि ते सुद्धा शासकीय रुग्णालयात दाखल आहेत आणि तेलीवाडी येथील फक्त दोन रुग्ण काही दिवसांपूर्वी ऍक्टिव्ह होते ते पण निगेटिव्ह झालेत मग कॅन्टोन्मेंन झोन करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे सरपंच यांनी असे विधान केलेच कसे असा प्रश्न निगुडे युवा शक्तीच्या पदाधिकारी आणि युवकांनी उपस्थित केला.
यावेळी सरपंच श्री समीर गावडे म्हणाले की, मला विश्वासात न घेता उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी माझ्या नावाखाली समाज माध्यमांवर आणि वर्तमानपत्रात स्टेटमेंट दिले. वास्तविक या वृत्तशी माझा काहीही संबंध नसल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त केली. यावेळी युवाशक्ती संघटनेचे अनिल तुळसकर, सुरेश रुबजी, साईनाथ तुळसकर, सुनील तुळसकर, अजित तुळसकर ,बाबली तुळसकर, कृष्णा तुळसकर, दयानंद शेलटे, योगेश शिरोडकर, वैष्णव आरोस्कर, राजाराम साळगावकर, सुधीर शेलटे यांच्यासह वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

 

2

4