सावंतवाडी भोसले उद्याना समोरील जागा कोणाची खाजगी पार्किंग आहे का…?

2

विशाल सावंत; “त्या” प्रकाराला पालिका जबाबदार,तोरसकारांनी सल्ला देण्यापेक्षा वरिष्ठांकडे तक्रार करावी…

सावंतवाडी ता.०५: येथील भोसले उद्याना समोरील जागा हे कोणाचे खाजगी पार्किंग आहे का ?,असा सवाल करत पालिकेने त्या ठिकाणी योग्य नियोजन केले असते,तर कालचा मारहाणीचा प्रकार घडलाच नसता,अशी भूमिका युवा सेनेचे सावंतवाडी शहर अधिकारी विशाल सावंत यांनी मांडली.दरम्यान रुपेश राऊळ यांनी नगराध्यक्ष संजू परब यांच्या राजीनाम्याची केलेली मागणी योग्यच आहे.त्यामुळे निशांत तोरसकर यांनी सल्ला देण्या पेक्षा कालच्या घटनेची दखल घ्यावी व आपल्या वरिष्ठांना कळून,असे प्रकार पुन्हा घडू नयेतयासाठी प्रयत्न करावेत,असेही श्री.सावंत म्हणाले.याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की,काल शहरात घडलेला प्रकार हा अतिशय निंदनीय आहे.याठिकाणी असे प्रकार उचित नाही.सावंतवाडीला शांत आणि सुसंस्कृत शहर म्हणून ओळखले जाते.शिवसेनेची सत्ता असताना असे प्रकार याठिकाणी घडत नव्हते. मात्र आता सत्तातरानंतर प्रकारांना ऊत येताना दिसत आहे.कालचा प्रकार पाहता तो पार्किंगच्या वादातून झाल्याचे समजते.शहरातील पार्किंग हे परिषदेच्या अंतर्गत येते,असे असताना त्या ठिकाणी खुलेआम गाड्या पार्किंग केल्या जातात त्यावर नगर परिषदेचे नियोजन का नाही?, जगन्नाथराव भोसले उद्याना समोरील पार्किंग हे कोणाचे खाजगी पार्किंग आहे का? ,त्यामुळे नगरपालिकेने त्याठिकाणी पार्किंगचे योग्य नियोजन केले असते तर कालचा हा प्रकार घडला नसता, तसेच शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी नगराध्यक्ष संजू परब यांच्या राजीनाम्याची केलेली मागणी ही योग्यच.आहे.त्यामुळे श्री. तोरसकर यांनी रूपेश राऊळ यांना सल्ला देण्यापेक्षा कालच्या प्रकाराची दखल घ्यावी व आपल्या वरिष्ठांना कळवून शहरात असे प्रकार पुन्हा होऊ नयेत,यासाठी प्रयत्न करावेत.

2

4