सावंतवाडीत राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने जागतिक दिनानिमित्त वृक्षारोपण…

2

सावंतवाडी,ता.०५: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी दिनानिमित्त पर्यावरण जोपासण्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक माध्यमिक विभाग एन.पी. मानकर,प्रशालेचे प्राथमिक विभाग मुख्याध्यापक प्रदीप सावंत,एनसीसी विभाग प्रमुख कॅप्टन गोपाळ गवस,सहाय्यक शिक्षक एस.पी. कुलकर्णी,एस.वी.पेडणेकर, अमित कांबळे,चतुर्थ श्रेणी,कर्मचारी ठाकूर आदी उपस्थित होते.
दरम्यान प्रत्यक्ष शाळा सुरू नसल्याने आजच्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली.यावेळी काही विद्यार्थ्यांनी वर्च्युअल पद्धतीने सहभाग नोंदवला, व राष्ट्रीय छात्र सेनेच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्र यांच्या व्हाट्सअप ग्रुप वर पर्यावरण दिनानिमित्त माहितीपट विद्यार्थ्यांमधील पर्यावरण प्रेम वाढावे, या उद्देशाने पाठविण्यात आला व विद्यार्थ्यांना पर्यावरण विषयी जाणीव जागृती करण्यात आली.

6

4