सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विषयी माहिती देणाऱ्या वेबसाईटचे ८ जूनला लोकार्पण…

48
2
Google search engine
Google search engine
Google search engine

५० पेक्षा जास्त देश -विदेशातील भाषेत उपलब्ध होणार माहिती; सुरेश प्रभूंच्या हस्ते सोहळा…

सिंधुदुर्गनगरी ता.०६: जिल्हा हा महाराष्ट्र व भारतातील मान्यता असलेला पर्यटन जिल्हा आहे.जिल्ह्यातील पर्यटन स्थळांविषयी माहिती टूर एजंट तसेच पर्यटनासाठी जिल्ह्यात येणाऱ्या देश विदेशातील नागरिकांना त्यांच्या स्थानिक भाषेत उपलब्ध झाल्यास जिल्हात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल, हा मुख्य उद्देश ग्रुहीत धरून मंगळवार दिनांक ८ जूनला सकाळी ११ वाजता खासदार सुरेशजी प्रभू यांच्या माध्यमातून व्हर्च्युअल सभेच्या माध्यमातून ५० पेक्षा जास्त भाषा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची पर्यटन स्थळांची माहिती देणारे वेबसाईटचे लोकार्पण सोहळा होणार आहे.
यावेळी श्री वेंकटेशन धट्टारेन उपसंचालक भारत सरकार, श्री धनंजय सावळकर संचालक महाराष्ट्र राज्य,सौ. लीना लाड माजी डेप्युटी संचालक भारत सरकार, श्री दीपक हर्णे संचालक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पुणे,श्री उदय कदम सेक्रेटरी ट्रव्हलर असोशिएशन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे ही वेबसाईट डेव्हलप करण्यासाठी महासंघाच्या सोशल मीडिया टीम प्रमुख श्री किशोर दाभोलकर यांच्या माध्यमातून काम चालू असून यामध्ये देशविदेशातील मराठी,हिंदी,तेलगू,मल्याळम,
बंगाली,पंजाबी,कन्नड,उर्दू,इंग्रजी,चायनीज,रशियन,लॅटिन,पौर्तुगाल,तुर्की,अरेबियन अश्या प्रकारच्या ५० प्रमुख भाषेचा समावेश असणार आहे.
सरकारी पातळीवर जिल्ह्याचा नियोजनबद्ध पध्दतीने स्थानिकांना समाविष्ट करून पर्यटन विकास होणे गरजेचे होते पर्यटन जिल्हा घोषित होऊन २३ वर्षापेक्षा जास्त काळ होऊन गेला आहे. पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा शाश्वत पर्यटन विकास व्हावा यांसाठी सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघा मार्फत प्रयत्न चालू असून संघा मार्फत जिह्यातील आठही तालुक्यात पदाधिकारी यांची नेमणूक करण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीनां पत्रव्यवहार करून आपल्या गावचा पर्यटन विकास आराखडा बनविण्याची विनंती करण्यात आली आहे.महासंघाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग पर्यटन वाढीसाठी विशेष प्रयत्न चालू असून यांमुळे जिह्यातील शाश्वत पर्यटन वाढीसाठी नक्कीच उपयोग होईल असा विश्वास सिंधुदुर्ग पर्यटन व्यवसायीक महासंघाला वाटत आहे.

\