सडुरे येथील अविवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…

2
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वैभववाडी, ता.०७: सडुरे येथील अविवाहीत तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सुरज सुरेश पांचाळ सुतार (वय २८) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी राञी ९ वा. पूर्वी घडली. घटनेची खबर त्याचा भाऊ प्रशांत पांचाळ सुतार यांनी वैभववाडी पोलिस ठाण्यात दिली आहे.
मयत सुरज पांचाळ सुतार याला दारुचे व्यसन होते. तसेच तो मानसिक रुग्णही होता. त्याच्या मानसोपचार तज्ञांकडून औषधउपचार सुरु होते. सोमवारी राञी घरात कोणी नसताना घरात हाॕलमधील छपराच्या लाकडी बारला नायलाॕनची दोरी बांधून गळफास लावून घेतला. आई, वडील , बहीण देवळात गेली होती. तर भाऊ वैभववाडी येथे मेडीकल दुकानात कामाला आहे. तो घरी गेल्यानंतर त्याच्या ही घटना निदर्शनास आली. घटनेची खबर मयताचा भाऊ प्रशांत यांनी वैभववाडी पोलिसांना दिली. माहीती मिळताच वैभववाडी पोलिस निरीक्षक अतुल जाधव, उपनिरीक्षक प्रवीण देसाई, बीट अंमलदार राहूल पवार, मारुती साखरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन मंगळवारी दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

\