पुढच्या वर्षीचा आराखडा यावर्षीच तयार करा..

2

संजना सावंत;पाणीटंचाई आढावा बैठकीत सूचना…

सावंतवाडी ता.२९: यावर्षीची पाणीटंचाई लक्षात घेता पुढच्या वर्षी अशी परिस्थिती निर्माण होऊ नये त्यासाठी ऑक्टोंबर महिन्यातच आराखडा तयार करा,ग्रामसेवकांनी पूर्णवेळ ग्रामपंचायत कार्यालयात थांबा अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी आज येथे दिल्या.येथील पंचायत समिती कार्यालयात तालुक्यातील अधिकारी व पदाधिकारी यांच्यासोबत सौ.सावंत यांनी पाणीटंचाई आढावा बैठक घेतली.
यावेळी बांधकाम सभापती जेराॅन फर्नाडीस, सावंतवाडी स्वाभिमान तालुकाध्यक्ष संजू परब,समाजकल्याण सभापती अंकुश जाधव,महिला बालकल्याण सभापती पल्लवी राऊळ,गटविकास अधिकारी गजानन भोसले,ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता पाताडे, सभापती पंकज पेडणेकर, उपसभापती संदिप नेमळेकर, जि. प. सदस्य उत्तम पांढरे, पं.स सदस्य श्रीकृष्ण सावंत, पाणीपुरवठा उपअभियंता सुरेश राणे, विस्तार अधिकारी गजानन धरणे आदी उपस्थित होते.
संजना सावंत म्हणाल्या संभाव्य पाणीटंचाई संदर्भात जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या कामांचे मंजुरी प्रस्ताव पूर्ण झाले असून इ टेंडर प्रक्रिया राबवून येत्या 31 मे पर्यंत कामे पूर्ण करण्यात येणार आहे मात्र काही कामे बक्षीस पत्र अभावी रखडली असून यासंदर्भात महसूल विभागाकडून तडजोड करण्यात यावे.

6

4