सावंतवाडीत श्री देव पाटेकर देवघरात उद्या श्रावण मास समाप्ती सोहळा…

2

सावंतवाडी ता.२५: येथील राजवाड्यातील संस्थानकालीन श्री।देव पाटेकर देवघरातील श्रावण मास समाप्ती सोहळा उद्या दिनांक २६ ऑगस्ट रोजी संपन्न होणार आहे.यानिमित्त विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच सकाळी ११ वाजल्यापासून भक्तांना देवाचे दर्शन घेता येणार आहे.
सावंतवाडी संस्थानच्या राजमाता कै.सत्वशीला देवी भोसले यांच्या आशीर्वादाने गेली सात वर्ष हा सोहळा याठिकाणी संपन्न होत आहे.तरी प्रतिवर्षीप्रमाणे या सोहळ्यास उपस्थित राहून भक्तगणांनी दर्शनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन राजघराण्याकडून माजी आमदार शिवराम दळवी यांनी केले आहे.

1

4