आदित्य ठाकरेंची शाबासकी मिळविण्यापेक्षा जनतेच्या सोबत राहा…

313
2
Google search engine
Google search engine
Google search engine

विक्रांत नाईक यांची हरी खोबरेकर यांच्यावर टीका ; जनतेच्या हितासाठी कार्यशाळा घेण्यासाठी प्रयत्न करा…

मालवण, ता. ०३ : शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी कधीतरी प्रसिद्धीपत्रक देताना स्वतःची अक्कल वापरावी. आमदार, खासदार यांच्या ओंजळीने पाणी पिण्याचे बंद करून आदित्य ठाकरे यांची शाबासकी मिळविण्यासाठी काम न करता किनारपट्टीच्या जनतेच्या हितासाठी त्यांच्यासोबत राहावे अशी टीका भाजप युवा मोर्चा अध्यक्ष विक्रांत नाईक यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
केंद्रीय वन व पर्यावरण खात्यामार्फत ही सुनावणी सुरू असली तरी प्रत्येक राज्याच्या वन व पर्यावरण खात्यामार्फत त्या राज्याच्या जनतेस जनसुनावणी अपेक्षित असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात २८ सप्टेंबर रोजी झालेल्या सीआरझेड ऑनलाईन सुनावणीस जनतेचा विरोध असूनही जनतेस न जुमानता सुनावणी झालीच. या सभेत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत जवळ जवळ एक ते दीड तास ही सुनावणी कोण घेत आहे अशी विचारणा करीत होते. परंतु राज्याच्या ठाकरे सरकारच्या पर्यावरण खात्याच्या अधिकाऱ्यानी शेवटपर्यंत त्यांना उत्तर न देता त्यांचा अपमान केला. शेवटी थकून ते गप्प झाले. कारण ठाकरे घराण्यासमोर ते हतबल होते आणि हे सर्व वैभव नाईक व अनेक शिवसैनिक बघ्याची भूमिका घेत त्यांचा अपमान होताना बघत होते. मालवण पंचायत समितीत ऑनलाईन सुनावणीत बसून हरी खोबरेकर आनंद घेत होते. त्यावेळी स्वतःच्या खासदारांचा अपमान होत आहे हे त्यांना समजले नाही किंवा हे समजण्याची त्यांची कुवत नसेल. मात्र या संबंधी मात्र भाजपा प्रवक्ते बाबा मोंडकर यांनी खासदारांचा अपमान करणाऱ्या राज्य प्रशासनाचा निषेध केला त्यावेळी बाजूला बसून हरी खोबरेकर बघत होते. त्यावेळी त्यांच्या तोंडात कुठला शब्द आला नाही.
भारतीय जनता पक्षाचा सीआरझेड कायद्याला विरोध नसून चुकीच्या पद्धतीने चाललेल्या प्रक्रियेस विरोध आहे. या सुनावणीच्या माध्यमातून २०११ पर्यतचा डाटाबेस व या कालावधीमधील सँटेलाईट नकाशावर ही सुनावणी होणार व ९ वर्षापूर्वीच्या माहिती आधारे बनविलेल्या नकाशाच्या माध्यमातून सीआरझेड जनतेवर लादून त्यांना विस्थापित करण्याचा शिवसेनेच डाव आम्ही या सुनावणीत जनतेसमोर आणला आहे. ही गोष्ट जनतेच्या लक्षात आली हे समजल्यानंतर हे जनतेचे स्वार्थी कैवारी असलेले जिल्ह्यातील शिवसेना आमदार, खासदार आम्ही कोणाची हरकत असल्यास आवश्यक तो बदल करून घेऊ असे सांगत फिरत आहेत. पण जिल्ह्याच्या नदी, खाडी, समुद्रकिनारी वसलेल्या लोकांना स्थानिक ठिकाणी या विषयीची कार्यशाळा न झाल्यामुळे सीआरझेडची असलेल्या अपुऱ्या माहितीमुळे नदी, खाडी व समुद्रकिनारी वसलेला २ लाखापेक्षा जास्त संख्येने असलेले नागरीक हरकत कशी घेणार त्यापेक्षा २०२० च्या माहिती आधारे परत वस्तुस्थिती दर्शक नकाशा बनवला गेल्यास या जनसुनावणीसाठी जनतेकडुन अपेक्षित प्रतिसाद मिळेल. जनतेच्या मनातील सीआरझेड कायदा अस्तित्वात येईल. पण हे समजायची हरी खोबरेकर यांची कुवत पाहिजे. समजत नसेल तर वेळ काढुन आमच्याकडे या. आम्ही समजावू आणि राहिला विषय पर्यटनासाठी बाबा मोंडकर यांनी काय केले ते जाऊन त्या पर्यटन व्यवसायिकांना विचारा आणि सोबत जाताना आमदार वैभव नाईक यांना घेऊन जा. कारण पर्यटन व्यावसायिकांचे लाल झेंडा आंदोलन सुरू आहे. तुमच्या स्थानिक आमदारांनी व तुमच्या पर्यटन मंत्र्यांनी काय दिवे लावलेत ते लक्षात येईल. त्यामुळे आमच्या नादाला न लागता ९ वर्षापूर्वीचा नकाशा बदलून सद्य:स्थितीतला नकाशा व जनतेमधे जाऊन या विषयाच्या माहितीची कार्यशाळा ठाकरे सरकार कशी घेईल त्यासाठी प्रयत्न करा. जनतेच्या हितासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत असेही श्री. नाईक यांनी म्हटले आहे.

\