आंबेगावात दारुबंदीची ग्रामस्थांची मागणी

2

पोलिसांना निवेदन : अन्यथा 30 तारखेला आंदोलनाचा इशारा

सावंतवाडी, ता. 21 : येथील आंबेगावात मोठ्या प्रमाणात अवैध दारुविक्री राजरोस सुरू आहे. त्यामुळे गावातील अनेक लोक दारुच्या आहारी गेले असून एका युवकाने आत्महत्या केली आहे. त्यामुळे गावात दारुबंदी करा, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने आज पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांच्याकडे करण्यात आली आहे.
यावेळी संदेश कारिवडेकर, नामदेव नाईक, महेश जाधव, केदू शेळके, रुपेश जाधव, संतोष राणे आदी उपस्थित होते. गावात दारुबंदी होणे काळाची गरज आहे. त्यामुळे याबाबत तात्काळ निर्णय घ्या, अन्यथा येत्या 30 तारखेला आपल्या कार्यालयासमोर उपोषण करावे लागेल असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे.

4

4