आकेरी तिठयापासुन दीड किलोमीटर अंतरावर झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत

2

कुडाळ: झाराप परिसरात आकेरी तिठयापासुन दीड किलोमीटर अंतरावर मुंबई गोवा महामार्गावर आकेशियाचे झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.ही घटना आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. रस्त्यावर आडवे झाड कोसळल्यामुळे कुडाळ सावंतवाडी महामार्गा वरची वाहतूक खोळंबली आहे. याबाबतची माहिती मालवण येथील सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांनी दिली. वाहतूकीला होणारा अडथळा लक्षात घेता संबंधित यंत्रणेने तात्काळ अडथळा दूर करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

24

4