मुंबईतील सिध्दार्थ कॉलेज क्रिकेट संघ ठरला कारगील चषकाचा मानकरी…

2
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडीचा एम्स अ‍ॅकेडमी उपविजेता; नागेश रेगे सामनावीर, तेजस चाळके उत्कृष्ठ फलंदाज…

सावंतवाडी,ता.०२: येथे आयोजित करण्यात आलेल्या कारगील चषक स्पर्धेचा मानकरी मुंबई येथील सिध्दार्थ कॉलेज हा संघ ठरला तर सावंतवाडीच्या एम्स क्रिकेट अ‍ॅकेडमीने उपविजेतेपद पटकाविले
तर उत्कृष्ठ फलंदाज तेजस चाळके, उत्कृष्ठ गोलंदाज श्रेयस मंडलिक, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षण जगदीश सुवर्णा तर मालिकावीर नागेश रेगे हा खेळाडू ठरला. एम्स अ‍ॅकेडमीच्या माध्यमातून सावंतवाडी जिमखाना मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या संघाला मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी सावंतवाडी पालिकेचे माजी आरोग्य व क्रीडा सभापती परिमल नाईक, माजी नगरसेवक उदय नाईक, लायन्स क्लबचे अध्यक्ष विद्याधर तावडे, झोन चेअरमन अशोक देसाई, आयुर्वेदीक महाविद्यालयाचे संचालक बाळ बोर्डेकर, सिध्दार्थ महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्रविण खानोलकर, प्रशिक्षक विशाल गायकवाड, शशांक यादव आदी उपस्थित होते.

\