वडाचापाट ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे बांधकामाच्या चौकशीचे आदेश…

22
2
Google search engine
Google search engine
Google search engine

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या सूचना ; स्थायी समितीच्या बैठकीत जोरदार चर्चा…

ओरोस,ता.०७: वडाचापाट ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे कामकाज चौकशी होईलपर्यंत तात्काळ थांबविण्यात यावे,अशा सूचना आज येथे झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी दिली आहे.

जिल्हा परिषद स्थायी समितिची मासिक सभा नाथ पै सभागृहात संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, सभा सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, विषय समिती सभापती महेंद्र चव्हाण, डॉ अनिशा दळवी, शर्वाणी गांवकर, अंकुश जाधव, गटनेते रणजीत देसाई, संतोष साटविलकर, रेश्मा सावंत, विष्णुदास कुबल, संजय पडते, अमरसेन सावंत यांच्यासह खातेप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.
संतोष साटविलकर यांनी हा विषय काढत वडाचापाट ग्राम पंचायत इमारत गेली ४०-४५ वर्षे कार्यरत आहे. ती जमीन शासनाच्या नावावर करून देण्यास जमीन मालक तयार आहे. तरीही दुसऱ्या ठिकाणी बक्षीसपत्र करून जिल्हा वार्षिक योजनेतून येथे नवीन इमारत काम सुरु करण्यात आले आहे. त्याला ग्रामसभेची मान्यता नाही. ज्या ग्रामसभेची मान्यता दाखविली जात आहे. त्या सभेला ४० ग्रामस्थ उपस्थित होते. यातील २४ ग्रामस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षाना लेखी पत्र देत अशाप्रकारे सभेत ठराव झाला नसल्याचे सांगितले आहे. यावर संजय पडते यानी जागा बदलसाठी आवश्यक असलेला ग्रामसभा ठराव झालेला आहे. गटविकास अधिकारी यांनी मान्यता दिली आहे. कार्यारंभ आदेश झालेला आहे, असे सांगितले. त्यावर साटविलकर यानी हे काम तात्काळ थांबले पाहिजे. पुन्हा ग्रामसभा घ्या. त्या ग्रामसभेत बहुमत असेल त्याप्रमाणे निर्णय घ्या, अशी मागणी केली. त्यानुसार भाजपच्या सर्वच सदस्यांनी मागणी लावून धरली. अखेर अध्यक्षा सौ सावंत यानी चौकशी पूर्ण होईपर्यंत हे काम थांबविण्याचे आदेश दिले. तशाप्रकारे ठराव घेण्यात आला. यावेळी संजय पडते यानी काम थांबविण्याचे आदेश देण्यास विरोध दर्शविला. ग्राम पंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील यानी यावेळी प्रशासकीय बाब समोर ठेवली.

\