आयुष पाटणकरची प्री नॅशनल नेमबाजी स्पर्धेसाठी निवड…

2
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०९: येथील उपरकर शूटिंग रेंज मध्ये प्रशिक्षण घेणारा आणि मदरक्वीन हायस्कूलचा विद्यार्थी आयुष दत्तप्रसाद पाटणकर याची अहमदाबाद गुजरात येथे होणाऱ्या प्री नॅशनल नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १८ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत १० मीटर एअर पिस्टल प्रकारात आयुष पाटणकर याची निवड झाली आहे. पुणे येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य रायफल असोसिएशनच्या चॅम्पियनशिप सब युथ वयोगट स्पर्धेत आयुषने ३४२ गुण मिळवत प्री नॅशनल स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली होती. आयुषषने यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे झालेल्या यूथ गेम्स २०२१ मध्ये शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. प्रशिक्षक कांचन उपरकर आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक एडव्होकेट विक्रम भांगले यांच्या मार्गदर्शनाखाली तो प्रशिक्षण घेत आहे. आयुषच्या निवडीबद्दल त्याचे आजोबा व मुख्यमंत्री महोदयांचे माजी जनसंपर्क अधिकारी सतीश पाटणकर, वडील दत्तप्रसाद पाटणकर, मदरक्वीन शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक यांनी आयुषचे अभिनंदन केले आहे.

\